IND vs NZ | भारताविरुद्ध शतक करत टॉम लॅथमने केला ‘हा’ विक्रम
ऑकलँड: काल भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. हा सामना ईडन पार्क येथे खेळला गेला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला 307 गावांचे लक्ष दिले होते. न्यूझीलंडने हा सामना आपल्या नावावर केला. या सामन्यानंतर न्युझीलँडने मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.
भारताने न्यूझीलंडला दिलेले 307 धावांचे लक्ष न्यूझीलंड संघाने टॉम लॅथम (Tom Latham) च्या शतकाच्या जोरावर 47.1 षटकमध्ये पूर्ण केले. टॉम लॅथम आणि कर्णधार कॅन विलियम्सन या दोघांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी 221 धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर नाबाद शतकी खेळी खेळत टॉम लॅथम आपल्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये न्युझीलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरून भारतीय संघाने 7 बाद 306 धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंड संघ लक्ष्याचा पाठलाग करत असताना न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने शानदार शतक करत आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला. यामध्ये त्याने 104 चेंडू मध्ये 145 धावा केल्या.
टॉम लॅथमने तब्बल 76 चेंडूमध्ये आपले शतक पूर्ण केले होते. लॅथमचे हे एक दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील सातवे शतक आहे. या खेळीनंतर टॉम लॅथम भारताविरुद्ध सर्वाधिक धावसंख्या करणारा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर लॅथम आणि केन विलियम्सन यांच्यातली ही भागीदारी वनडे मधील सर्वोच्च भागीदारी आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | शिंदे गटात गेलेल्या प्रतापवराव जाधवांच्या मतदार संघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा!
- Cancer Pain | कॅन्सरमध्ये शरीरातील ‘या’ भागांमध्ये होतात वेदना
- Avatar: The Way of Water | ‘अवतार:द वे ऑफ वॉटर’चा भारतात धुमाकूळ, रिलीजपूर्वी झाली हजारो टिकिटांची बुकिंग
- Shreyas Iyer | न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यरने केला ‘हा’ नवा विक्रम
- National Milk Day | गाई-म्हशीच्या दुधापेक्षा जास्त फायदेशीर आहे शेळीचे दूध, जाणून घ्या फायदे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.