IND vs NZ | भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात पावसामुळे येणार व्यत्यय?, जाणून घ्या हवामान अंदाज

नेपियर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) या संघांमध्ये तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेचा आज 22 नोव्हेंबर रोजी नेपियर (Napier) येथे तिसरा सामना होणार आहे. या मालिकेमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाने 65 धावांनी विजय मिळवला होता. या मालिकेचे जेतेपद आपल्या नावावर करण्यासाठी भारतीय संघाला आज होणारा शेवटचा सामना जिंकावा लागेल.

न्युझीलँडमध्ये सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. या मालिकेच्या पहिल्या टी 20 सामन्यांमध्ये वेलिंग्टन मध्ये झालेला मुसळधार पाऊस याचा साक्षीदार आहे. त्याचबरोबर टी 20 दुसरा सामन्यांमध्ये पावसाने दया दाखवत कोणताही व्यत्यय आणला नाही. दरम्यान, आज होणाऱ्या तिसऱ्या टी 20 सामन्यामध्ये नेपियर येथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सामान्यादरम्यान पावसाचा जोर वाढला नाही तर सामन्यातील काही षटके शिल्लक राहिल्यास भारतीय संघ त्यानुसार खेळून आपली आघाडी कायम ठेवेल. नेपियरमधील तापमानाबद्दल बोलायचे झाले तर तेथे कमाल तापमान 24 अंश सेंटीग्रेड आणि किमान तापमान 14 अंश सेंटीग्रेड राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या मालिकेच्या दुसऱ्या टी 20 सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने नाबाद शतकाने टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली होती. सूर्यकुमारने यामध्ये 111 नाबाद धावा केल्या होत्या. तर भारतीय संघाने 20 षटकात दोन गडी गमावून 191 धावा केल्या होत्या. तर भारतीय संघाने न्यूझीलंडला 18.5 षटकात 121 धावांवर रोखून हा सामना आपल्या नावावर केला होता.

भारत विरुद्ध न्यूझीलंड या मालिकेमध्ये भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू जरी कमी असले तरी भारतीय संघातील युवा खेळाडूंना या सामन्यांमध्ये आपली कामगिरी सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.