IND vs NZ | वॉशिंग्टनचा ‘सुंदर’ कहर, अप्रतिम शॉट मारून जिंकले चाहत्यांचे मन

ऑकलॅंड: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये वनडे मालिकेचा पहिला सामना सुरू आहे. हा सामना ईडन पार्कवर खेळला जात आहे. या सामन्यातील नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने न्यूझीलंडला 306 धावांची लक्ष दिले आहे. यामध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) ने या सामन्यात कहर केला आहे. त्याने या सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी केली आहे. त्याने शेवटच्या षटकांमध्ये 16 चेंडूत 37 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 200 पेक्षा अधिक होता. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 4 चौकार मारले आहे.

या सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरने मॅट हेनरीच्या चेंडूवर तुफानी षटकार मारला आहे. 49 व्या शतकातील पाचव्या चेंडूवर त्याने हा शॉट मारला होता. वॉशिंग्टनचा हा शॉट पाहून चाहत्यांसोबत गोलंदाजही थक्क झाले आहेत. त्याचा हा शॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात संजू सॅमसन बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीसाठी आला होता. वॉशिंग्टनने मैदानावर येताच आपले इरादे स्पष्ट केले होते. त्याने शेवटच्या षटकांमध्ये 16 चेंडुमध्ये 36 धावा केल्या. वॉशिंग्टनने या खेळी दरम्यान अनेक उत्कृष्ट शॉट मारले. तर 49 व्या षटकात हेनरीविरुद्ध मारलेला शॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरने आपल्या सर्वोत्तम गुणाचे प्रदर्शन केले आहे.

भारत आणि न्युझीलँडयांच्यामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने ५० षटकांमध्ये सात गडी गमावून 306 धावा केल्या आहेत. न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी 307 धावा पूर्ण करायच्या आहेत. या सामन्यांमध्ये भारतीय संघाचे सलामीवीर शुभमन गिल आणि शिखर धवन यांनी अर्धशतकीय खेळी खेळले. त्याचबरोबर या सामन्यामध्ये विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या श्रेयस अय्यरने 80 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.