IND vs NZ | शार्दुलच्या मेहनतीवर चहलने फिरवले पाणी, सोडली Finn Allen ची सोपी कॅच
ऑकलँड: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये वनडे मालिकेचा पहिला सामना सुरू आहे. हा सामना ईडन पार्कवर खेळला जात आहे. या सामन्यातील नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने न्यूझीलंडला 306 धावांची लक्ष दिले आहे. त्याला प्रत्युत्तर देत न्यूझीलंड संघाने दमदार सुरुवात केली आहे. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा सलामीवीर फिन एलन (Finn Allen) याने या खेळीस चांगली सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) ने त्याला त्याच्या षटकमध्ये पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न केला होता. शार्दुलला त्याला अडकवण्यात जवळपास यश मिळालेच होते पण युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ने शार्दुलच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे.
भारताने दिलेल्या 306 भावांचा पाठलाग करत न्युझीलँड संघाने चांगली सुरुवात केली होती. दरम्यान, न्युझीलँडच्या दोन्ही सलामीवीरांनी डाव हळूहळू पुढे नेला होता. अशाच फिन एलन याने वैयक्तिक 22 धावा करत चांगला फॉर्म धरला होता. आठव्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर एक लेन्थ बॉल टाकत फिन एलनला शार्दुलने अडकवण्याचा प्रयत्न केला. एलनने या बोलला अडकत एक शॉट खेळला, मात्र वेळ योग्य नसल्यामुळे तो चेंडू युजवेंद्र चहलच्या हातात गेला आणि त्याच्याकडून ती कॅच सुटली. चेहलचे हे खराब क्षेत्ररक्षण पाहून शार्दुलसह कर्णधारही निराश झाला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यांमध्ये न्युझीलँड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. भारतीय संघाच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. त्याचबरोबर या सामन्यामध्ये शुभम गिल कर्णधार शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकीय खेळी खेळली.
भारतीय संघाला या सामन्यामध्ये चांगली सुरुवात मिळाल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये वॉशिंग्टन सुंदरने धडाकेबाज फलंदाजी करत भारतीय संघाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली. अशा परिस्थितीत 306 धावांचा पाठलाग करत न्युझीलँड संघाचा फिन एलन 30 धावा करत बाद झाला. तर कॉनवेच्या रूपाने 68 धावांवर दुसरी न्यूझीलंड संघाने विकेट गमावली.
महत्वाच्या बातम्या
- Shahajibapu Patil | “गुवाहाटीमुळेच सेलिब्रिटी झालो, आता दरवर्षी…”, शहाजीबापू पाटील झाले भावूक
- Ashish Shelar on Sanjay Raut | संजय राऊतांनी आगलावेपणा करु नये ; आशिष शेलार यांचा घणाघात
- Oil Free Samosa | तेलाचा वापर न करता ‘या’ पद्धतीने बनवा भाजलेले समोसे
- Sanjay Raut | “मलाही कुंडली कळते आणि त्यांच्या कुंडलीत…”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
- Santosh Bangar | लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन ; संतोष बांगर यांची पुन्हा कर्मचाऱ्यांना दमदाटी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.