IND vs NZ | हॉटस्टार नाही तर ‘या’ ॲपवर दिसणार भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20 सामना

नेपियर : सध्या न्यूझीलंडमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) या संघांमध्ये तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने या सामन्यामधील दुसरा सामना आपल्या नावावर केला आहे. तर या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यांमध्ये देखील प्रथम फलंदाजी करताना पावसामुळे थोडासा व्यत्यय निर्माण झाला होता. मात्र दुसरा सामना रद्द न होता सामन्यातील षटके कमी करत हा सामना पार पडला. या सामन्यांमध्ये भारताने न्युझीलँडला 65 धावांनी पराभूत केले. तरी या मालिकेतील तिसरा सामना म्हणजेच अखेरचा सामना आज 22 नोव्हेंबर रोजी नेपियर येथे खेळला जाणार आहे.

टी 20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पराभूत झाले होते. अशा परिस्थितीत दोन्ही संघाला स्पर्धेच्या आठवणी विसरून नव्याने सुरुवात करायची आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. अशा परिस्थितीत 2024 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी हार्दिक पांड्या महत्त्वाचा खेळाडू मानला जात आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघातील विराट कोहली, रोहित शर्मा आणि इतर अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय संघामध्ये असलेल्या युवा खेळाडूंना या सामन्यांमध्ये आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे.

IND vs NZ हॉटस्टार नाही तर ‘या’ॲपवर दिसणार

भारत विरुद्ध न्यूझीलंड या मालिकेचा दुसरा सामना सुरू असताना चाहते चिंतेत होते की, हा सामना टीव्हीवर कसा पाहिला पाहिजे? आज या मालिकेचा तिसरा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. हा सामना हॉटस्टार (Hotstar) वर प्रदर्शित न  होता ॲमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर स्ट्रीम होणार आहे. त्याचबरोबर हा सामना तुम्ही दूरदर्शनच्या डीडी स्पोर्ट्स (DD Sports) वर देखील थेट प्रक्षेपण पाहू शकता.

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या टी 20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यांमध्ये न्युझीलँड संघाचा कर्णधार केन विलियम्सन खेळणार नाही. विलियम्सन यांच्या जागी टीम साऊथी संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघामध्ये देखील काही बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये कुलदीप यादवला खेळण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर उमरान मलिक आणि संजू सॅमसंगला देखील संधी दिली जाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.