IND vs NZ 1st ODI | टॉम लॅथम आणि केन विल्यमसनची वेगवान बॅटींग, न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय!

IND vs NZ 1st ODI | भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना आज ऑकलंडमध्ये खेळवला गेला. हा सामना न्यूझीलंडने ७ विकेट व १७ चेंडू राखून जिंकला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३०६ धावा केल्या. संघाकडून शुभमन गिल, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके झळकावली. मात्र न्यूझीलंडने भारताने दिलेले ध्येय सहज पार केले.

या रोमांचक सामन्याचा हिरो ठरला यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम. संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १०४ चेंडूत १४५ धावांची सर्वोच्च नाबाद शतकी खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १९ चौकार आणि पाच षटकार निघाले.

ऑकलंडमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित षटकांत सात गडी गमावून ३०६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघाने ४७.१ षटकांत तीन गडी गमावून सहज गाठले. टॉम लॅथमशिवाय कर्णधार केन विल्यमसनने ९८ चेंडूत नाबाद ९४ धावांचे योगदान दिले. या विजयासह न्यूझीलंडने सध्या सुरू असलेल्या मालिकेतही १-० अशी आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.