InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

IND vs NZ: मॅन्चेस्टरमध्ये आभाळ स्वच्छ, खेळाची आशा?

विश्वचषकातील उपांत्य सामना आज होणार का? सगळीकडे याच प्रश्नावर चर्चा होत आहे. रिझर्व्ह डेला भारत आणि न्यूझीलंडमधील उपांत्य सामन्याची क्रिकेट चाहते प्रतीक्षा करत आहेत. यादरम्यान मॅन्चेस्टरमधून हवामानाचे ताजे अपडेट्स आहेत की, तिथे आभाळ स्वच्छ आहे. रात्रीपासून तिथे पाऊस झालेला नाही. मात्र हवामान विभागाने अर्ध्या सामन्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. आज सामना सुरु झाला तर न्यूझीलंडचा संघ आपली उर्वरित षटकं पूर्ण खेळेल.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानातील सामना पावसामुळे मंगळवारी थांबवून आज खेळवण्याचं ठरवलं. आज दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. विश्वचषकात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे आयसीसी क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. पाऊस नाही अशा ठिकाणी पुढचा विश्वचषक आयोजित करा, असा सल्ला क्रिकेट चाहत्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply