IND vs Pak | पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा भावूक, राष्ट्रगीत गाताना अश्रू अनावर!

IND vs Pak | नवी दिल्ली : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच महत्त्वाचा असतो. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे रविवारी पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमनेसामने आलेत. मेलबर्न क्रिकेट मैदानावरील हाऊसफुल्ल स्टेडियमवर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताचा कर्णधार रोहित शर्माचा कर्णधार म्हणून विश्वचषकातील पहिला सामना होताच तो भावूक झाला.

भारतीय राष्ट्रगीतादरम्यान रोहित शर्मा भावूक झाला. यावेळी त्याचा चेहराही उदास झाला. राष्ट्रगीत संपल्यावर रोहित शर्माने भावनिक झालेला चेहऱ्यावरचे हावभाव लपवण्यासाठी डोळे पूर्णपणे बंद केले. शेवटी तो स्वत:ला रोखू शकला नाही. त्याचे डोळे त्याच्या भावूक झाल्याची कहाणी सांगत होते. यावेळी रोहित शर्माच भावूक होण्यामागच कारण आहे. भारताचं राष्ट्रगीत. भारतीय राष्ट्रगीताचे शब्द ऐकताच रोहित शर्माच्या डोळ्यात पाणी आलं.

राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्माने आपले डोळे बंद केले व भावनांवर नियंत्रण ठेवलं. राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्मा डोळे बंद करुन उभा होता. त्याने आकाशाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळे भाव होते. त्याने कसंबसं स्वत:ला इमोशनल होण्यापासून रोखलं. पण अखेरीस रोहितच्या डोळ्यात पाणी दिसलच. रोहित शर्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.