IND VS PAK | शमीची अप्रतिम कामगिरी! 5 चेंडूत 4 षटकार ठोकणाऱ्या इफ्तिखारला रोखले
IND VS PAK | T20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना सुरु आहे. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ सुमारे खेळत आहेत. भारत आणि पाकिस्तान संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. गेल्या टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या. यावेळी शमीने अप्रतिम कामगिरी केली.
T20 विश्वचषक स्पर्धेच्या या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती, परंतु मधल्या फळीतील इफ्तिखार अहमदने आपल्या जबरदस्त फटकेबाजीने भारताला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहम्मद शमीने त्याचा प्लॅन फिरवला. शमीने आपल्या उत्कृष्ट चेंडूने इफ्तिखार अहमदचा खेळ संपवला. इफ्तिखारने 34 चेंडूत 51 धावांची खेळी खेळली आणि यावेळी त्याने ४ षटकार मारले.
यानंतर शेवटी पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या. पाकिस्तानकडून शान मसूदने 42 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी इफ्तिखार अहमदने 34 चेंडूत 51 धावा केल्या.
- T20 World Cup | 2 वेळा T20 World Cup चॅम्पियन वेस्टइंडीज झाली वर्ल्ड कप मधून बाहेर, जाणून घ्या कारण
- India vs Pakistan | भारताने पाकिस्तानला 159 धावांवर रोखले, अर्शदीप-हार्दिकचा भेदक मारा
- Pravin Darekar | “…म्हणून ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत”, प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- India vs Pakistan । विराट कोहली पाकिस्तानची धुलाई करायला तयार, म्हणाला…
- Gold Silver Price | दिवाळीपूर्वी सोने-चांदी चे दर झाले स्वस्त, जाणून घ्या
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.