IND vs PAK । फलंदाजी करताना मला खूप दडपण जाणवत होते, विराट कोहलीने केला मोठा खुलासा

IND vs PAK । नवी दिल्ली : भारताच्या (IND vs PAK) पाकिस्तानविरुद्धच्या जबरदस्त विजयानंतर फक्त विराट कोहली याचीच चर्चा होत आहे. त्याने ज्या प्रकारे भारतीय संघाला विजयापर्यंत नेले, त्यावरून तो जगातील नंबर वन फलंदाज का आहे हे त्याने स्पष्ट केले. मात्र, या सामन्यादरम्यान विराट कोहलीही खूप दडपणाखाली होता. त्याने हार्दिक पांड्या सोबतच्या एका मुलाखतीदरम्यान आपल्यावर दबाव होता, असे उघड केले.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने अवघ्या 53 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या. शेवटपर्यंत क्रीजवर राहून संघाला विजय मिळवून दिला. चाहत्यांना जुन्या विराट कोहलीची झलक पाहायला मिळाली. ज्या वेळी टीम इंडियाच्या चार विकेट अवघ्या 31 धावांवर पडल्या होत्या, तेव्हा हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी पाचव्या विकेटसाठी 113 धावांची जबरदस्त भागीदारी करत संघाला सामन्यात पुनरागमन केले. हार्दिक आणि विराटची ही भागीदारी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली.

सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याने विराट कोहलीची मुलाखत घेतली. या संभाषणादरम्यान विराट कोहली म्हणाला, ‘हार्दिक पांड्या जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा खूप दबाव होता. खरे सांगायचे तर मी याआधी असे अनेक सामने खेळल्यामुळे मला खूप दडपण जाणवत होते. लोकांच्या अपेक्षा किती जास्त आहेत हे मला माहीत आहे. त्या भागीदारीत हार्दिक पंड्या अगदी बेधडक खेळला. आम्ही भागीदारी करू असे हार्दिकने मला सांगितले. त्यावेळी मला काही मोठे फटके मारायचे होते. पण तेही धोक्याचे होते. कारण आम्ही चार विकेट गमावल्या होत्या. आम्ही 100 धावा केव्हा जोडल्या हे आम्हाला कळलेही नाही.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.