IND vs PAK । “बाबर आझमने या क्रमांकावर फलंदाजी केली, तर भारताविरुद्ध… “; सामन्यापूर्वीच माजी खेळाडूच मोठे विधान

मुंबई : पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिज याने आशिया चषक 2022 मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघाचा कर्णधार बाबर आझमला एक महत्त्वाची सूचना दिली आहे. हाफिजच्या म्हणण्यानुसार, बाबरला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडताना मोठे मन दाखवावे लागेल आणि स्वतःला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जावे लागेल.

सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला कट्टर प्रतिस्पर्धी भारताचा सामना करावा लागणार आहे. या आशिया चषकात संघाच्या अव्वल फळीतील फलंदाजांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्याचवेळी बाबरकडूनसुद्धा मोठी खेळीही दिसली नाही.या वेळी सलामीच्या फलंदाजांमध्ये इंटेंट आणि आक्रमकतेचा अभाव असल्याचे हाफिजने सुचवले.

पीटीव्ही स्पोर्ट्सवरील चर्चेदरम्यान, माजी अष्टपैलू खेळाडूने सांगितले की फखर जमानला शीर्षस्थानी पाहायला मला आवडेल. आणि यासाठी त्याने बाबरला ३ नंबरवर येण्याचा सल्ला दिला आहे. पुढे ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून हा वाद सुरू होता. त्यांचा यशाचा दर पाहिला तर मला वाटते की विश्वचषकापर्यंत आपण याबद्दल बोलणे थांबवले पाहिजे.

बाबारला खेळू द्या फक्त त्याला स्ट्राइक रेट आणि इंटेंट सुधारण्याची गरज आहे. मला असं वाटत कि फखरने मोकळेपणाने खेळायला हाव. पण हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा बाबरने कर्णधार म्हणून मोठे मन दाखवले आणि स्वतः तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. दुसरा खेळाडू अधिक चांगला खेळू शकतो असे त्याला वाटत असेल तर त्याने त्याचा वापर करायला हवा, असाही हाफिज म्हणाला.

पुढे हाफिज म्हणाला, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने पुढे असे सुचवले की अंतिम निर्णय आझमच्या हातात आहे आणि त्याला अजूनही वाटते की उजव्या हाताचा फलंदाज रिझवानची जागा घेऊ शकतो. हा निर्णय घेण्यात गैर काहीच नाही. मात्र हा निर्णय फक्त बाबर आझम घेऊ शकतात. असे म्हटल्यावर, मला अजूनही वाटते की तो रिझवानसह सलामीवीर म्हणून यशस्वी ठरला आहे, त्याला फक्त त्याचा स्ट्राइक रेट आणि इंटेंट यात सुधारणा करायची आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.