IND VS PAK । भारताची ऑस्ट्रेलियात ‘विराट’ दिवाळी; पाकिस्तानला धो-धो धुतले

IND VS PAK |  नवी दिल्ली : T20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामना भारताने जिंकला. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ खेळले. गेल्या टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे होता. अन् भारताने बदला घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या 7 ओव्हरमध्ये भारताचे 4 खेळाडू तंबूत परतले. मात्र कोहली आणि हार्दिकने दिवाळी साजरी केली आणि पाकिस्तानवर 4 विकेट राखून विजय मिळवला.

काउंटर इनिंग खेळताना भारताची सुरुवातही खराब झाली. नसीम शाहने केएल राहुलला ४ धावांवर बाद केले. त्याचवेळी रोहित शर्मालाही केवळ 4 धावांचे योगदान देता आले. सूर्यकुमार यादवने येताच दोन चांगले फटके खेळले पण त्याचा डाव 15 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. चौथ्या क्रमांकावर आलेल्या अक्षर पटेलला संधीचा फायदा घेता आला नाही आणि तो 2 धावांवर धावबाद झाला.

160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 31 धावांत 4 मोठ्या विकेट्स गमावल्या. यानंतर कोहली आणि हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. यासह संघाने गतवर्षी विश्वचषकात 10 विकेट गमावल्याचा बदलाही घेतला आहे. याआधी पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद आणि शान मसूद यांनी अर्धशतके झळकावली. कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. 6 चौकार आणि 4 षटकार मारले.

दुसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने कोहलीला स्ट्राइक दिली. षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराटने षटकार मारला आणि त्याला नो-बॉल देण्यात आला. आता भारताला तीन चेंडूत 6 धावांची गरज होती. विराट फ्री हिटवर बोल्ड झाला पण 3 धावांवर धावला. पाचव्या चेंडूवर कार्तिक यष्टिचित झाला. शेवटच्या चेंडूवर अश्विनने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. कोहली ५३ चेंडूत ८२ धावा करून नाबाद राहिला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.