IND vs PAK । रोहित शर्मा पुन्हा पुन्हा का फ्लॉप होतोय? या दिग्गज खेळाडूने केला मोठा खुलासा

मुंबई । आशिया कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या फॉर्मवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहित शर्मा अद्यापही आपल्या फॉर्ममध्ये दिसलेला नाही. त्याचवेळी माजी क्रिकेटर अतुल वासन याने त्याच्या खराब फॉर्मवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मा वारंवार का फ्लॉप होत आहे हे त्याने सांगितले.

रोहित शर्मा सध्या आशिया कपमध्ये खेळत असून त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकले आहेत. या संघाने पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवला आहे. मात्र, रोहित शर्माची बॅट काही बोलत नाही. शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला असून त्याची फलंदाजी बघता त्याच्या बॅटवर चेंडूच येत नाहीयेत असे वाटते. तो थोडा थकलेला दिसतोय.

अतुल वासन यांनी एबीपी न्यूजवर बोलताना सांगितले की, ‘रोहित शर्माचे मागील आकडे बघितले तर त्यानुसार तो अद्याप फलंदाजी करू शकलेला नाही. याचे कारण ही खेळपट्टी काही काळ खेळते. याशिवाय रोहित शर्मा दुखापतीतून पुनरागमन करत आहे. शिवाय वय थोडं जास्त झालं की मग फॉर्ममध्ये यायला नक्कीच वेळ लागतो. तुम्ही तरुण असता तेव्हा पटकन फॉर्ममध्ये येता. विराट कोहलीही त्या फॉर्ममध्ये दिसला नाही ज्यासाठी तो ओळखला जातो, असं तो म्हणाला.

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिजनेही रोहित शर्मावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला होता की रोहित शर्मावर कर्णधारपदाचा दबाव खूप आहे. त्याला हे दडपण खूप जाणवत आहे, त्यामुळेच तो या कर्णधारपदाचा भार जास्त काळ पेलू शकणार नाही.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.