IND VS PAK । हार्दिक मला आत्मविश्वास देत होता; विजयानंतर विराट कोहलीचा मोठा खुलासा
IND VS PAK । नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर दणदणीत विजय मिळवला. प्रथम खेळताना पाकिस्तानने 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. विराट कोहली याने एकट्याने संघाला विजयापर्यंत नेले. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. कोहलीने या खेळीला आपली सर्वोत्तम खेळी म्हटले आहे.
विराट कोहली म्हणाला की, याबाबत बोलताना माझ्याकडे शब्द नाहीत, हे कसे घडले ते मला माहीत नाही. शेवटपर्यंत टिकून राहिलो तर आपण हे करू शकू असा विश्वास हार्दिकला होता. जेव्हा शाहीन पॅव्हेलियनच्या टोकावरून गोलंदाजी करत होता, तेव्हाच आम्ही त्याच्यासमोर धावा करण्याचा निर्णय घेतला. हॅरिस हा त्यांचा मुख्य गोलंदाज होता. त्याच्याविरोधात मी २ षटकार मारले.
तो पुढे म्हणाला की, नवाजचे एक षटक बाकी होते, त्यामुळे जर हरिसच्या ओव्हरमध्ये धावा करण्यात यशस्वी झालो तर समोरच्या संघाचा आत्मविश्वास कमी होईल. 8 चेंडूत 28 धावांवरून 6 चेंडूत 16 धावा शेवटी हव्या होत्या. याआधी मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी माझ्याकडे होती.तसेच हार्दिक मला आत्मविश्वास देत राहिला. गर्दी अभूतपूर्व झाली होती. तुम्ही सर्व चहाते मला पाठिंबा देत राहा आणि तुमच्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
चार विकेट लवकर पडल्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी कोहली आणि पंड्या यांच्या खांद्यावर आली. मात्र दोघांनी ती चोख बजावली. अखेर टीम इंडियाचा विजय झाला.
महत्वाच्या बातम्या :
- IND VS PAK | पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हार्दिक पांड्या ढसाढसा रडला! म्हणाला, “आमच्यासाठी आई बापाने…”
- Weight Loss Tips | दिवाळीमध्ये जर वजन वाढू द्यायचे नसेल तर ‘या’ गोष्टी करा फॉलो
- IND VS PAK | ते शेवटचे थरारक षटक, पाकिस्तान संघ कावरा-बावरा ; वाचा नेमकं काय घडलं
- IND VS PAK । भारताची ऑस्ट्रेलियात ‘विराट’ दिवाळी; पाकिस्तानला धो-धो धुतले
- Health Care Tips | तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जळजळ होत असेल तर, ‘हे’ उपाय करून बघा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.