IND VS SA | सामनावीर ठरल्यानंतर कुलदीप यादवने केले मोठे वक्तव्य, म्हणाला…

नवी दिल्ली । भारताने मंगळवारी तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 99 धावांत ऑलआऊट झाला. टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला. कुलदीप यादव याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यावर त्याने मोठा प्रतिसाद देत आपली प्रतिक्रिया दिली.

कुलदीप यादवने पहिले 4 विकेट घेत पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले. प्रत्युत्तरात भारताने सलामीवीर शुभमन गिल याच्या (57 चेंडूत 49 धावा, आठ चौकार) 19.1 षटकांत 3 बाद 105 धावा करून लक्ष्याचा पाठलाग केला. श्रेयस अय्यर याने 23 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. मात्र, दुर्दैवाने त्याला अर्धशतक झळकावता आले नाही. त्याच्या या खेळीला ट्विटरवर उत्तम प्रतिक्रिया मिळाल्या.

प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाल्यानंतर कुलदीप यादव म्हणाला कि, खरे सांगायचे तर मला खूप आनंद होत आहे. सामनावीराचा पुरस्कार मिळाला . विकेट बोरोबर होती आणि मी माझ्या गोलंदाजीचा आनंद घेत आहे. मी सध्या जास्त विचार करत नाही, फक्त खेळावर लक्ष केंद्रित करतो आणि माझ्या स्वतःच्या खेळीवर लक्ष देतोय. मी चांगल्या भागात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. जास्त विचार न करता माझे पुढचे लक्ष्य सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.