IND vs SL | ‘एनसीए’ने बुमराहला केले तंदुरुस्त घोषित, श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये करणार पुनरागमन

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ला राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने (एनसीए) पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले आहे. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेमध्ये पुनरागमन करण्यासाठी बुमराह आता पूर्णपणे सज्ज झाला आहे.

गेल्या काही महिन्यापासून बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. भारतासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये त्याने अखेरचा सामना खेळला होता. त्याच्या या दुखापतीमुळे त्याला विश्वचषक टी-20 स्पर्धेपासून मुकावे लागले होते. त्याचबरोबर आशिया चषक टी-20 मध्ये देखील तो अनुउपस्थित होता. गेल्या काही महिन्यांपासून तो एनसीएमध्ये त्याच्या दुखापतीवर उपचार घेत होतात. पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी त्याने भरपूर मेहनत घेतली आहे. मात्र, दुखापतीमुळे पुरेसा सराव न झाल्याने त्याला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात सामील करण्यात आले नव्हते. दरम्यान, तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याला भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे.

श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटी येथे होणार आहे. 10 जानेवारी पासून एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारी रोजी कोलकत्ता येथे होणार आहे. तर, तिसरा सामना तिरुवनंतपुरम येथे 15 रोजी होईल. दरम्यान, 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघामध्ये रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.