IND vs SL | टीम इंडियासाठी खुशखबर! जडेजा आणि बुमराह करू शकतात संघामध्ये पुनरागमन

IND vs SL | मुंबई: वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 (T-20) आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI) खेळली जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.

2022 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी खूप चढ-उतारांनी भरलेले होते. यावर्षी अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर पडले होते. त्यामुळे भारतीय संघाला आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघातील जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची नावे या यादीमध्ये आघाडीवर आहेत. या दोन्ही खेळाडूंना जवळपास पूर्ण वर्षभरच दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघापासून दूर राहावे लागले होते. अशा परिस्थितीमध्ये हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेतन शर्माच्या नेतृत्वाखाली निवड समितीने अजून भारतीय संघाची या मालिकेसाठी घोषणा केलेली नाही. मंगळवारी या मालिकेच्या संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याला टी-20 मालिकेचा कर्णधार बनवले जाऊ शकते. कारण भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेमध्ये जखमी झाला होता. दरम्यान, तो ही मालिका खेळणार नाही, अशी संभाव्यता वर्तवली जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेमध्ये संघात अनेक बदल बघायला मिळू शकतात.

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या टी-20 सामन्यांमध्ये निवड समिती युवा खेळाडूंना संधी देऊ शकते. त्याचबरोबर या मालिकेदरम्यान भारतीय संघातील ज्येष्ठ खेळाडूंची रजा जवळपास निश्चित मानली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये निवड समिती संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवू शकते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेपासून जसप्रीत बुमराह भारतीय संघापासून दूर आहे. बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. तर दुसरीकडे रवींद्र जडेजा आशिया चषकामध्ये गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त झाला होता. तो देखील त्याच्या या दुखापतीतून सावरत आहे. अशा परिस्थितीमध्ये हे दोघे श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.