IND vs SL | निवडकर्त्यांच्या निर्णयामुळे ‘या’ खेळाडूचा टी-20 प्रवास थांबणार?

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये 3 जानेवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 संघाचे कर्णधार पद सांभाळणार आहे. तर, एका वरिष्ठ खेळाडूला या संघामध्ये स्थान मिळाले नाही. हा खेळाडू टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा भाग होता.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. दरम्यान, अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला (R Ashwin) या मालिकेसाठी भारतीय संघात सामील केले गेले नाही. त्याने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर तो टी-20 क्रिकेटमध्ये दिसला नाही. अशा परिस्थितीत आता तो टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळेल की नाही, याबाबत काहीच सांगता येत नाही.

जुलै 2022 मध्ये झालेल्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आर अश्विनने टी-20 संघामध्ये पुनरागन केले होते. त्याचबरोबर तो आशिया चषक 2022 मध्ये ही खेळला होता. मात्र, टी-20 विश्वचषकामध्ये त्याला काही उत्कृष्ट कामगिरी करता आली नाही. त्याने या स्पर्धेमध्ये 6 सामन्यात फक्त 6 विकेट घेतल्या होत्या. आर अश्विनने आत्तापर्यंत भारतासाठी 65 टी-20 सामन्यांमध्ये 62 विकेट्स घेतल्या आहेत. तर, भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे. कसोटी सामन्यामध्ये त्याने आत्तापर्यंत भारतासाठी 88 कसोटी सामन्यांमध्ये 449 विकेट्स घेतल्या आहे.

दरम्यान, अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावा आणि चारशे बळी घेणारा जगातील दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. त्याने 88 कसोटी सामन्यांमध्ये 3000 धावा पूर्ण केले आहेत. तर, 88 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 449 विकेट घेतक्या आहेत. अश्विनच्या आधी रिचर्ड हेडली याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा आणि 400 बळींचा टप्पा गाठला होता. त्याने तब्बल 87 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.