IND vs SL | ” व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्ही…” ; सामना हरल्यानंतर सुनील गावस्कर यांचं मोठं वक्तव्य

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: काल पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पार पडला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

भारत आणि श्रीलंका दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारतीय संघाने फेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. यामध्ये भारताने 20 षटकांमध्ये 206 धावा केल्या. दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी या डावात तब्बल सात नो-बॉल टाकले. यामध्ये अर्शदीप सिंगने पाच नो-बॉल टाकले. गोलंदाजाच्या या कामगिरीनंतर सुनील गावस्कर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

माध्यमांसोबत बोलताना सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजीवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले,”व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्ही हे करू शकत नाही. खेळाडू नेहमी म्हणत असतात की आज गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही. त्याचबरोबर नो-बॉल फेकणे आपल्या नियंत्रण नसते. मात्र तुम्ही गोलंदाजी केल्यावर फलंदाज काय करतो हा मुद्दा वेगळा आहे. पण नो-बॉल जाऊ नये हे पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात असतं.”

अर्षदीपने कालच्या सामन्यामध्ये दोन षटकांमध्ये 37 धावा दिल्या. यामध्ये त्याने 5 नो-बॉल टाकले होते. त्यामुळे टीम इंडिया अधिक निराश झाली होती. या पाच नो-बॉल पैकी त्याने पहिल्या षटकात 3 नो-बॉल टाकले होते. त्याच्या या खराब गोलंदाजीमुळे भारतीय संघाचा पराभव झाला अशा चर्चा क्रिकेट विश्वास सुरू आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यामधील टी-20 मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना 7 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. टीम इंडियाचे कालचे प्रदर्शन पाहता, भारतीय संघामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या