IND vs SL | श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी ‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचे नेतृत्व

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 (T-20) आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI) खेळली जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ला भारतीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. तर, एक दिवसीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) कडेच आहे. टी-20 सामन्याच्या मालिकेसाठी निवड समितीने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला उपकर्णधार बनवले आहे. तर, या मालिकेमध्ये भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये फलंदाजीत ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांना संघात स्थान मिळाले आहे. तर, गोलंदाजीमध्ये शिवम मावी, मुकेश कुमार, उमरान मलिक यांना संघात सामील करण्यात आले आहे. दरम्यान, यष्टीरक्षक रिषभ पंतला टी-20 आणि एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. टी-20 सामन्यांमध्ये इशान किशनची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तर, एक दिवसीय सामन्यासाठी केएल राहुल आणि इशान किशनकडे यष्टीरक्षक पद सोपवण्यात आले आहे. एकदिवसीय मालिकेमध्ये हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये शुभमन गिलला दोन्ही संघात स्थान मिळाले आहे. एक दिवसीय सामन्यांमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज या प्रमुख गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, अर्षदीप सिंग टी-20 आणि एकदिवसीय दोन्ही संघात सामील झाला आहे. एकदिवसीय मालिकेसाठी कुलदीप यादवला देखील संघामध्ये स्थान मिळाले आहे.

भारतीय टी-20 संघामध्ये हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.