IND vs SL | श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये विराटची जागा घेणार ‘हा’ खेळाडू?

IND vs SL | मुंबई: पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 (T-20) आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI) खेळली जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. यामध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेदरम्यान भारतीय संघामध्ये मोठे बदल दिसतील. आज या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. या सामन्यांमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ला विश्रांती देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेमध्ये विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार आहे. दरम्यान, मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) ला संधी मिळण्याची शक्यता आहे. राहुल त्रिपाठी बांगलादेश दौऱ्यावर एक दिवसीय संघामध्ये सामील झाला होता. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. राहुल त्रिपाठी पहिल्यांदा 2022 मध्ये आयर्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचा भाग बनला होता. पण या मालिकेमध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेमध्ये सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉला देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याने भारतासाठी पहिला आणि शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2021 मध्ये खेळला होता. आता पुन्हा एकदा त्याला भारतीय टी-20 संघामध्ये स्थान मिळू शकते.

पृथ्वी शॉ गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या फिटनेसवर काम करत आहे. आयपीएल 2022 पासून त्याने सात ते आठ किलो वजन कमी केल्याची माहिती समोर आली आहे. पृथ्वी शॉला केएल राहुलच्या जागी टी-20 संघामध्ये संधी दिली जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.