IND vs SL | अर्षदीपच्या खराब गोलंदाजीवर इरफान पठाणचे ट्विट, म्हणाला…

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: काल पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंग (Arshdeep Singh) काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने या मालिकेतील पहिला सामना खेळला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो मैदानावर उतरताच त्याच्याकडून संघाला चांगल्या अपेक्षा होत्या. मात्र, त्याने कालच्या सामन्यात चाहत्यांना निराश केले आहे.

अर्षदीपने कालच्या सामन्यामध्ये दोन षटकांमध्ये 37 धावा दिल्या. यामध्ये त्याने 5 नो-बॉल टाकले होते. त्यामुळे टीम इंडिया अधिक निराश झाली होती. या पाच नो-बॉल पैकी त्याने पहिल्या षटकात 3 नो-बॉल टाकले होते. अर्षदीपच्या या खराब गोलंदाजीनंतर त्याच्यावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) ने त्याला सुनावले आहे. इरफान पठाण ट्वीट करत म्हणाला,”कायदे मे रहोगे तो फायदे मेरा रहोगे.”

भारत आणि श्रीलंका दुसरा टी-20 सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेने भारताला 207 धावांचे लक्ष दिले होते. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती.

हे लक्ष गाठत असताना 57 धावावर अर्धा संघ बाद झाला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी 91 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर देखील भारतीय संघाला लक्ष काढता आले नाही. तब्बल 16 धावांनी भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला.

महत्वाच्या बातम्या