IND vs SL | ऋषभच्या अनुपस्थितीमध्ये इशान किशनने केली उत्कृष्ट विकेटकिपिंग, पाहा VIDEO

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ फक्त 160 धावा करू शकला. हा सामना आपल्या नावावर करून भारतीय संघाने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये टी-20 मालिकेतील पहिला सामना सुरू असताना, टीम इंडियातील यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) ने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सामन्यातील त्याचा एक जबरदस्त झेल कॅमेरामध्ये कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

श्रीलंकेचा डाव सुरू असताना वेगवान गोलंदाज उमरान मलिकने चेंडू टाकल्यावर फलंदाज असलंकाने हवेत शॉट खेळला होता. हा शॉट विकेटच्या मागे गेला. हा झेल घेण्यासाठी यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन वेगाने धावत गेला आणि त्याने अप्रतिम झेल घेतली आणि असलंकाला बाद केले.

इशान किशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रिषभ पंतच्या अनुपस्थितीमध्ये इशान किशनने उत्कृष्ट यष्टीरक्षण केले आहे. त्याच्या या कामगिरीचे माजी गोलंदाज इरफान पठाणने कौतुक केले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर चाहते इशान किशनचे कौतुक करत आहे.

महत्वाच्या बातम्या