IND vs SL | धोनी आणि पठाणचा 13 वर्षांपूर्वीचा ‘हा’ विक्रम अक्षर आणि हुड्डाने मोडला

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ फक्त 160 धावा करू शकला. हा सामना आपल्या नावावर करून भारतीय संघाने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या हा सामना जिंकण्याचे श्रेय दीपक हुड्डा (Dipak Hooda) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) यांना जाते. या दोघांनी या सामन्यांमध्ये महत्त्वाचे योगदान देत धोनी आणि पठाणचा 13 वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडला आहे.

14.1 शतकामध्ये भारतीय संघाने पाच विकेट गमावल्या होत्या. यावेळी टीम इंडियाची धावसंख्या फक्त 94 होती. यानंतर सहाव्या विकेटसाठी दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी 162 धावांची खेळी खेळली. या दोघांच्या उत्कृष्ट केळीमुळे भारतीय संघ जेतेदापर्यंत पोहोचला. या खेळीनंतर त्यांनी एम एस धोनी आणि युसुफ पठाण यांचा विक्रम मोडला आहे.

सहाव्या विकेटसाठी भागीदारी करणाऱ्यांच्या यादीमध्ये हुड्डा आणि अक्षर ही जोडी दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांचे नाव आहे. तर या सामन्यानंतर धोनी आणि पठाण ही जोडी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये भारतीय संघाकडून दीपक हुड्डा, इशान किशन, अक्षर पटेल यांनी फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिले. तर गोलंदाजीमध्ये शिवम मावी, उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी 2-2 बळी घेतले. या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 5 जानेवारी रोजी पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या