IND vs SL | पदार्पणामध्ये शिवम मावीची उत्कृष्ट कामगिरी, सामन्यानंतर व्यक्त केल्या भावना

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ फक्त 160 धावा करू शकला. हा सामना आपल्या नावावर करून भारतीय संघाने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यामध्ये शिवम मावी (Shivam Mavi) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. या सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्याच्या माध्यमातून शिवम मावीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. या सामन्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यामध्ये 22 धावा देत 4 बळी घेतले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडिया हा सामना जिंकू शकली. या सामन्यानंतर शिवमने आपल्या पदार्पणाबाबत भावना व्यक्त केली आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाबद्दल प्रतिक्रिया देत असताना शिवम म्हणाला,”जेव्हा मी मैदानावर आलो तेव्हा स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटत होते. गेल्या सहा वर्षापासून मी या क्षणाची वाट पाहत होतो. यापूर्वी मी दुखापतीने त्रस्त होतो.”

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये भारतीय संघाकडून दीपक हुड्डा, इशान किशन, अक्षर पटेल यांनी फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिले. तर गोलंदाजीमध्ये शिवम व्यतिरिक्त उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी 2-2 बळी घेतले. या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 5 जानेवारी रोजी पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या