IND vs SL | सामन्यापूर्वी भारतीय संघाला धक्का! ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर

IND vs SL | पुणे: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये आज टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ फक्त 160 धावा करू शकला. हा सामना आपल्या नावावर करून भारतीय संघाने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

आजचा सामना जिंकून भारतीय संघ 2-0 ने आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मालिकेमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी श्रीलंकेचा संघ आज जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. दरम्यान, आज होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर पडला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात झेल घेताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आज होणाऱ्या सामन्यासाठी पुण्यामध्ये येऊ शकला नाही. त्याच्या जागी संघामध्ये जितेश शर्माचा समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा टी-20 सामना आज संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. सामन्याची नाणेफेक अर्धा तास आधी होईल. पुण्यातील हवामान स्वच्छ असल्यामुळे चाहत्यांना या सामन्याचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला नाही, तर हा सामना अधिक रंजक होईल.

आज होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या, दीपक हूड्डा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, आणि वाशिंग्टन सुंदर यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असू शकतो.

महत्वाच्या बातम्या