IND vs SL: Suryakumar Yadav ने ठोकले शानदार शतक

IND vs SL: Suryakumar Yadav – सूर्यकुमार यादवने श्रीलंके विरुद्ध शानदार शतक ठोकले आहे. त्याने सर्वात जलद शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. भारताने १९ ओव्हर मध्ये २१६ रन केले आहे.  सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल खेळत आहे.

सूर्यकुमार ने ११२ रन केले आहेत. भारताने श्रीलंके समोर २२८ चे लक्ष ठेवले आहे. सूर्याने अवघ्या 45 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलंय. सूर्याने या शतकी खेळीत 6 चौकार आणि 8 सिक्स ठोकले. सूर्याचं टी 20 कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलंय.

सूर्यकुमार यादवची तुलना एबी डिव्हिलियर्सशी करणे योग्य का नाही?

इरफान पठाण म्हणाले की, सूर्यकुमार यादवकडे डिव्हिलियर्स आणि जोस बटलरपेक्षा जास्त शॉट्स आहेत पण ताकदीचा विचार केल्यास हे दोन्ही खेळाडू सूर्याच्या पुढे आहेत, त्यामुळे सूर्यकुमारची तुलना डिव्हिलियर्स आणि जोस बटलरशी करणे योग्य नाही.

इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “सूर्यकुमार यादवची एबी डिव्हिलियर्सशी तुलना करणे कठीण आहे, कारण मला वाटते की एबी डिव्हिलियर्सकडे जास्त शक्ती होती. जेव्हा तुम्ही लॉंग ऑफ किंवा सातत्याने कव्हर मारण्याबद्दल बोलता तेव्हा तो सूर्यकुमार यादवपेक्षा खूप पुढे होता. जर आपण जॉस बटलरबद्दल बोललो तर, जेव्हा रेंज हिटिंगचा विचार केला जातो तेव्हा त्याच्याकडे तुलनेने जास्त शक्ती आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवच्या बाजूने मोठी गोष्ट म्हणजे तो कट खेळू शकतो, कव्हर्स हिट करू शकतो, मिड-विकेट खेळू शकतो आणि स्वीप करू शकतो.

सूर्यकुमार यादवने 44 T20I डाव खेळले आहेत आणि 44.75 च्या सरासरीने आणि 177.91 च्या स्ट्राइक रेटने 1466 धावा केल्या आहेत.

 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, धनंजया डिसिल्वा, चरित असालंका, अविष्का फर्नांडो, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीष तीक्षणा, कासुन रजिता आणि दिलशान मधुशंका.

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.