IND vs WI | उमरान मलिकला पुन्हा मिळाली टीम इंडियात जागा! वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: येत्या 12 जुलैपासून टीम इंडिया वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला वेस्ट इंडीज विरुद्ध 05 टी-20, 03 वनडे आणि 03 कसोटी सामने खेळायचे आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Umran Malik has made a comeback in the team
वेस्ट इंडीज (IND vs WI) विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार आहे. या मालिकेमध्ये रोहित शर्मा खेळणार नसल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्याला संघात स्थान मिळालं आहे. टीम इंडियातील स्टार खेळाडू संजू सॅमसंग (Sanju Samsung) ला देखील ही एकदिवसीय मालिका खेळायची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर उमरान मलिकचा देखील संघात कमबॅक झाला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, शुभमन गिल, संजू सॅमसन सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, इशान किशन, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, जयदेव उनाडकर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आणि उमरान मलिक, या खेळाडूंना स्थान मिळालं आहे.
दरम्यान, 12 जुलै ते 16 जुलै या कालावधीत भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 20 जुलै ते 24 जुलै दरम्यान होईल. या दौऱ्यात भारतीय संघ 04, 06, 08 आणि 12 ऑगस्ट रोजी टी-20 मालिका खेळणार आहे. तर 27 जुलै, 29 जुलै आणि 15 ऑगस्ट रोजी या दौऱ्यातील एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | अजित पवारांना प्रमुख करणं हे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना परवडणार नाही – संजय शिरसाट
- IND vs WI | वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंना मिळालं कसोटी संघात स्थान
- Kishori Pednekar | उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? किशोरी पेडणेकरांची ED चौकशी होण्याची शक्यता
- Devendra Fadnavis | ही ‘मोदी हटाव’ नव्हे ‘परिवार बचाव’ बैठक आहे; विरोधकांच्या बैठकीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Ashish Shelar | काँग्रेस की हिंदुत्व? कबर की स्मारक?, आशिष शेलारांच्या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरे देतील का?
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NqLNKj
Comments are closed.