IND vs WI | वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंना मिळालं कसोटी संघात स्थान

IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया वेस्ट इंडीज विरुद्ध 02 कसोटी, 03 एक दिवशी आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 12 जुलै 2023 पासून टीम इंडिया वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

Cheteshwar Pujara has been dropped from the Test squad

भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI ) यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad), मुकेश कुमार (Mukesh Kumar), यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal), नवदीप सैनी (Navdeep Saini) या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. तर चेतेश्वर पूजाराला कसोटी संघातून वगळण्यात आलं आहे.

दरम्यान, वेस्ट इंडीज (IND vs WI ) दौऱ्यावर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ला विश्रांती दिली जाण्याची शक्यता होती. मात्र, रोहितचं संघात स्थान कायम आहे. रोहित शर्मा पूर्णपणे फिट असून तो कसोटी सामने खेळणार आहे.

वेस्ट इंडीज (IND vs WI) दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, आर अश्विन, रवींद्र जडेजा, के एस भरत, ईशान किशन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जयदेव उनाडकर आणि मुकेश कुमार यांना स्थान मिळालं आहे.

महत्वाच्या बातम्या 

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3CLiFs6