IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडियाला वेस्ट इंडीज विरुद्ध 03 एकदिवसीय, 05 टी-20 आणि 02 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात टीम इंडियाच्या टी-20 संघात शुभमन गिलला (Shubman Gill) स्थान मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
Shubman Gill has excelled in all three forms of cricket
शुभमन गिलने क्रिकेटच्या तीनही फॉर्ममध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व फॉर्ममध्ये शतक ठोकले आहेत. तरही तो वेस्ट इंडीज दौऱ्यावर (IND vs WI) टीम इंडियाच्या टी-20 संघातून बाहेर होऊ शकतो.
मीडिया रिपोर्टनुसार, शुभमन गिलने सतत सामने खेळत आहे. गिलने डिसेंबरमध्ये झालेल्या बांगलादेश दौऱ्यानंतर लगेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेली 04 सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. त्यानंतर लगेच त्याने आयपीएल 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे वर्क लोड लक्षात घेता त्याला वेस्ट इंडीज (IND vs WI) विरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना 12 जुलै ते 16 जुलै दरम्यान होणार आहे. तर यांच्यातील दुसरा सामना 20 जुलै ते 24 जुलै दरम्यान पार पडेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी-20 मालिकेतील 05 सामने अनुक्रमे 4 ऑगस्ट, 6 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट रोजी होणार आहेत. तर एकदिवसीय मालिकेतील 03 सामने अनुक्रमे 27 जुलै, 29 जुलै आणि 15 ऑगस्ट रोजी खेळले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Micron Investment | तरुणांना मिळणार नव्या रोजगाराच्या संधी! केंद्र सरकारकडून सुमारे 300 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी
- WhatsApp | व्हाट्सॲप वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज! व्हाट्सॲपनं लॉन्च केलं चॅट लॉक फीचर
- Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस नाकाने भ्रष्टाचाराचे कांदे सोलतात – संजय राऊत
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या चिंतेत भर? मुंबई महानगरपालिकेच्या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर ED ची छापेमारी
- Ajit Pawar | अजित दादांना दाढी नसल्याने तो फिल येत नसेल; शिंदे गटाची खोचक टीका
Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/shubman-gill-out-of-ind-vs-wi-t20-series/?feed_id=45495