IND vs WI : सूर्यकुमार यादवच्या ‘या’ व्हिडिओने जिंकली लाखो क्रिकेट चाहत्यांची मने; पाहा VIDEO!

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाने पुन्हा एकदा मालिकेत पुनरागमन केले आहे. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारत आता २-१ ने आघाडीवर आहे. तिसऱ्या टी-२० वेस्टइंडीज ने भारताला १६५ धावांचे लक्ष दिले होते. या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माला पाठदुखीमुळे मैदान सोडावे लागले होते. यानंतर भारतीय चाहत्यांना सामना गमावण्याची भीती वाटत होती. मात्र सूर्यकुमार यादवने भारतासाठी ४४ चेंडूत ७६ धावांची खेळी करत संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.

सूर्यकुमार यादवला त्याच्या या शानदार खेळीसाठी ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ४ षटकार ठोकले होते. मात्र त्याच्या या दमदार खेळीनंतर त्याची चिमुकल्या चाहत्यांसोबतची वागणूक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्याच्या या वागणुकीने लाखो क्रिकेटच्या त्यांची मने जिंकली आहेत. सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर चिमुकल्या चाहत्यांची भेट घेतली आणि त्यांना ऑटोग्राफ दिला. यादरम्यान तो त्याच्या चाहत्यांना खूप प्रेमाने भेटला आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढली. बीसीसीआयने सूर्यकुमारचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओ सोबत कॅप्शन मध्ये लिहिले आहे, “सामना जिंकवणारी खेळी, हृदयस्पर्शी स्वभाव”.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना काइल मेयर्सच्या ७३ धावांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. भारतीय संघाला विजयासाठी १६५ धावांच्या लक्ष्य मिळाले होते. भारताकडून सलामीला सुरुवात करताना रोहित शर्माला दुखापतीचा सामना करावा लागला. त्यामुळे तो मैदानातून माघारी परतला. मात्र सूर्यकुमार यादवने ऋषभ पंत आणि दीपक हुडासोबत भागीदारी रचत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दोन्ही संघामधील मालिकेतील चौथा टी-२० सामना ६ ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.