IND vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया ‘या’ तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर
IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळला जात आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर दुपारी 03 वाजता या सामन्याला सुरुवात झाली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप संपल्यानंतर भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकबझने या दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
India will tour the West Indies from July 12 to August 13
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, भारत 12 जुलै पासून ते 13 ऑगस्ट पर्यंत वेस्टइंडीज (IND vs WI) दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणारे सामने जिओ सिनेमावर क्रिकेट चाहत्यांना मोफत बघता येणार आहेत. त्याचबरोबर हे सामने डीडी स्पोर्ट्सवर देखील तुम्ही बघू शकतात.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये होणारी मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाला वेस्टइंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी साधारण एक महिना विश्रांती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रिकबझने भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यामध्ये सुरू होणाऱ्या मालिकेच्या तारखेचा अंदाज बांधला आहे.
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलनंतर जिओ सिनेमाने हजारो सबस्क्रायबर गमावले असल्याचं, इनसाईट स्पोर्ट्स या पोर्टलच्या एका वृत्तामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यामध्ये होणारी मालिका तुम्हाला जिओ सिनेमावर मोफत बघता येऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे – सुप्रिया सुळे
- Nitesh Rane | कोल्हापूरमध्ये होणाऱ्या दंगलींमागं उध्दव ठाकरे मास्टरमाईंड? नितेश राणेंचा गंभीर आरोप
- Monsoon Update | दिलासादायक! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली आनंदाची बातमी
- Kolhapur Protest | तीव्र आंदोलनामुळं कोल्हापुरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद
- WTC Final | WTC फायनलचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? जाणून घ्या
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3oKCIUq
Comments are closed.