IND vs ZIM ICC T20 : उपांत्य फेरीचे तिकीट मेलबर्नमध्ये होणार पक्के? टीम इंडिया सज्ज!

IND vs ZIM ICC T20 | टीम इंडीयाने आतापर्यंत ICC T20 विश्वचषक स्पर्धेत मध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण तरीही त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. यासाठी भारताला उद्या (रविवार) झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. हा सामना जिंकून भारत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के करेल. मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. दुपारी एक वाजता दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानावर येतील. त्याचवेळी सामन्याचा खरा थरार अर्ध्या तासानंतर दुपारी दीड वाजता सुरू होईल.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उद्या मैदानात उतरणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर झिम्बाब्वेसमोर भारताचे आव्हान असेल आणि ते मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. जेणेकरून टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठता येईल. प्रत्यक्षात भारत 6 गुणांसह गट 2 मध्ये अव्वल आहे. दक्षिण आफ्रिका 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

उद्या तीन मोठे सामने-

पाकिस्तान संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडण्याच्या आशा अद्याप पूर्ण नाहीत. रविवारी तिन मोठे संघ मैदानात उतरतणार आहेत. दिवसाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जाईल आणि जर दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. दिवसाचा दुसरा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. जर पाकिस्तानने आपला सामना जिंकला तर भारताला झिम्बाब्वेवर मोठा विजय नोंदवणे आवश्यक आहे, कारण रनरेटमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा सरस आहे.

कुठे आणि कधील पाहाल सामना- 

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील T20 विश्वचषक-2022 सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल, नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर होणार आहे. डिस्ने हॉटस्टारवर सामना थेट प्रक्षेपित होईल. तसेच डीडी स्पोर्टवर हा सामना फ्री पाहता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.