IND vs ZIM ICC T20 | भारताचे झिम्बाब्वेला १८७ धावांचे लक्ष; केएल राहुल आणि सुर्यकूमारचे अर्धशतके
IND vs ZIM ICC T20 | भारतीय संघ आज T20 विश्वचषकातील त्यांच्या सुपर 12 च्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेशी भिडला आहे. भारताने आधीच उपांत्य फेरी गाठली असली तरी त्यांना विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. भारत हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहण्याचा प्रयत्न करेल. सुपर 12 मध्ये टीम इंडियाचा एकच सामना हरला आहे. दक्षिण आफ्रिकेशिवाय गटातील अन्य कोणत्याही संघाला त्यांना हरवता आलेले नाही. दरम्यान भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने झिम्बाब्वेला 187 धावांचे लक्ष दिले.
भारतीय संघाने तुफानी खेळीच्या जोरावर 186 धावा केल्या. संघासाठी केएल राहुलने 35 चेंडूत 51 धावा केल्या. त्याचवेळी सूर्यकुमारने 25 चेंडूत 61 धावा केल्या. या खेळीत त्याने सहा चौकार आणि चार षटकार मारले. झिम्बाब्वेसाठी हे लक्ष्य सोपे जाणार नाही.
शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवच्या बळावर भारताने 21 धावा जोडल्या आणि धावसंख्या 186 पर्यंत नेली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमारने पहिल्या डीप बॅकवर्ड लेगवर षटकार ठोकला. त्याचवेळी पाचव्या चेंडूवर चौकारही मारला. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार मारला.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant patil | “माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर…”; सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- Andheri By Election | अंधेरी पोट निवडणुकीत नोटा दोन नंबरला; नेमकं कारण काय?, जाणून घ्या
- IND vs ZIM ICC T20 | भारताचे झिम्बाब्वेला १८७ धावांचे लक्ष; केएल राहुल आणि सुर्यकूमारचे अर्धशतके
- Anil Parab | नोटाला एवढी मतं का मिळाली? अनिल परबांनी दिलं उत्तर, म्हणाले…
- Sushma Andhare । अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर सुषमा अंधारेंची भाजपवर टीका; म्हणाल्या…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.