IND vs ZIM ICC T20 | भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा घेतला निर्णय , ऋषभ पंतला संधी

IND vs ZIM ICC T20 | भारतीय संघ आज T20 विश्वचषकातील त्यांच्या सुपर 12 च्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेशी भिडणार आहे. भारताने आधीच उपांत्य फेरी गाठली असली तरी त्यांना विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. भारत हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहण्याचा प्रयत्न करेल. सुपर 12 मध्ये टीम इंडियाचा एकच सामना हरला आहे. दक्षिण आफ्रिकेशिवाय गटातील अन्य कोणत्याही संघाला त्यांना हरवता आलेले नाही. दरम्यान भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंत

इंडिया प्लेग इलेव्हन : केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

झिम्बाब्वेची प्लेइंग इलेव्हन:

वेस्ली माधवेरे, क्रेग इर्विन, रेगिस चकाबवा (विकेटकीपर), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, टॉम मुन्योंगा, रायन बर्ल, तेंडाई चतारा, रिचर्ड नगारवा, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुजबानी.
महत्वाच्या बातम्या :
You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.