InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

माझ्या दौऱ्यांमुळेच जगात भारताची ओळख झाली – नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पश्चिमबंगालच्या बिरभूम जिल्ह्यात प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी माझ्या दौऱ्यांमुळेच भारताला जगभरात ओळख मिळाल्याचे वक्तव्य केले आहे.

नरेंद्र मोदींचे वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यावरून विरोधकांनी मोदींवर नेहमीच टीका केली आहे. आता यावर नरेंद्र मोदींनी प्रचारसभेत उत्तर दिले आहे. मोदी म्हणाले की,  माझ्या दौऱ्यांमुळेच भारताला जगभरात ओळख झाली आहे. या पूर्वी कच्चे तेल व वायू आपल्याला अव्वाच्या सव्वा भावाने तसेच दीर्घकालीन कराराने घ्यावे लागत होते. आमच्या सरकारने चर्चेतून पुन्हा वाटाघाटी केल्याचे मोदींनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply