InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भारतीय संघाला मिळणार ६कोटी ७० लाख रुपये

भारतीय क्रिकेट संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रोज नवनवे विश्वविक्रम प्रस्थापित करत आहे. तसेच हा संघ कसोटी क्रमवारी मध्ये सध्या १२१ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. सध्या पाहून ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आहे. २३फेब्रुवारी पासून पुणे येथून या दौऱ्याची सुरुवात होत आहे.

जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक जरी कसोटी सामना जिंकला तर भारतीय संघ १ एप्रिल पर्यंत अव्वल स्थानी राहू शकतो. आणि जर असे झाले तर आयआयसीकडून भारतीय संघास तब्बल ६ कोटी ७० लाखांचे बक्षीस मिळू शकते.

  • जर ऑस्ट्रेलिया हि मालिका ४-० अशी जिंकला तर भारत कसोटी क्रमवारीत २ नंबरवर फेकला जाईल.
  • जर ऑस्ट्रेलिया हि मालिका ३-० असा जिंकला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर राहतील.
  • जर ऑस्ट्रेलिया हि मालिका २-० किंवा ३-१ असा जिंकला तर भारत पहिल्या क्रमांकावर कायम राहील.

त्यामुळे कॅप्टन कोहलीच्या टीमला कमीतकमी १ कसोटी जिंकावी किंवा २ कसोटी अनिर्णित राखाव्या लागतील.
सध्या भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलिया संघही पूर्ण जोशात आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.