InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

IndvsAus : पहिला एकदिवसीय सामना आज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या 5 एकदिवसीय मालिकेतील पहिली सामना आज खेळला जाणार आहे. टी20 मालिकेत भारताला 2-0 ने पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत विजय मिळविण्याचे दडपण भारतावर असणार आहे.

विश्वचषकाच्या दृष्टीने देखील ही मालिका महत्त्वाची असणार आहे. विश्वचषकापूर्वी भारताची ही शेवटची एकदिवसीय मालिका आहे. त्यामुळे ही मालिका जिंकण्याच्या इराद्यानेच भारत मैदानावर उतरेल. केएल राहुलने टी20 मालिकेत चांगली खेळी केली होती. मात्र दिनेश कार्तिकला योग्य खेळी करण्यात अपयश आले होते. 

पहिला एकदिवसीय सामना हा 2 मार्च रोजी राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, हैद्राबाद येथे खेळला जाणार आहे. दुपारी 2 वाजता सामन्याला सुरूवात होणार असून, स्टार नेटवर्कवर प्रेक्षकांना सामना पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.