InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नागपूरमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना, भारताचे पारडे जड

आगामी एकदिवसीय विश्वचषकाची रंगीत तालमी म्हणून सध्या सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेकडे पाहिले जात असून आज, मंगळवारी या तालमीचा ‘दुसरा अंक’ म्हणजेच दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. शनिवारी पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला हरवत भारताने पाच वनडेंच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे

उभय संघांनी नागपूरच्या जामठा स्टेडियमवर 3 एकदिवसीय सामने खेळले असून, या तीनही लढतींमध्ये भारताने विजय मिळवला आहे. 2009 मध्ये भारताने 99 धावांनी विजय मिळवला, 2013 मध्ये भारताने 351 धावांचे आव्हान सहा विकेट राखून पार केले, तर 2017 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर सात विकेटनी मात केली होती.

आजचा सामना नागपूर येथील मैदानावर दुपारी 1ः30 वाजता सुरू होणार असून,  स्टार नेटवर्कवर याचे लाईव्ह प्रेक्षपण पाहता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply