InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

India Vs New Zealand: न्यूझीलँडचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय

ICC Cricket World Cupमध्ये आज सेमीफायनलमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी, हा सामना आजच होणार आहे. न्यूझीलंडनं टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पावसाचा लहरीपणा लक्षात घेता येथे कोणत्या कॉम्बिनेशनने मैदानावर उतरावे, याचे उत्तर शोधण्यात दोन्ही संघांचे कर्णधार व्यग्र आहेत. या सामन्यात भारतीय संघ भुवनेश्वर कुमार किंवा मोहम्मद शमी यांच्यापैकी कोणाची निवड करतील? टीम इंडिया दोन फिरकीपटूंसह मैदानावर उतरेल का? केदार जाधव हा सहावा गोलंदाजाचा पर्याय असेल का ? रवींद्र जडेजाचे संघातील स्थान कायम राहिल का? असे अनेक प्रश्न भारतीय चाहत्यांना भेडसावत आहेत.

दरम्यान भारत – न्यूझीलंड यांचा यंदाच्या वर्ल्ड कपमधला हा पहिला सामना आहे. साखळी फेरीतील सामना पावासामुळं रद्द झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply