India vs Pakistan | भारताने पाकिस्तानला 159 धावांवर रोखले, अर्शदीप-हार्दिकचा भेदक मारा

India vs Pakistan । नवी दिल्ली : रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आज T20 विश्वचषक सुपर 12 मधील ‘ब्लॉकबस्टर’ सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करत आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाची फलंदाजी पार पडली.

सुरवातीला अर्शदीप, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार अप्रतिम कामगिरी करत आहेत. पाकिस्तानी फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने 2 बाद 32 धावा केल्या. यामध्ये अर्शदीपच्या गोलंदाजीने पाकिस्तान संघ चांगलाच हैराण झाला आहे. भारतीय गोलंदाजाने बाबर आझमला पहिल्याच विश्वचषकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. यानंतर दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने रिझवानलाही आपला बळी बनवले. रिझवानला केवळ 4 धावा करता आल्या. 10 ओव्हरमध्ये पाकीस्तानने फक्त 60 धावा करता आल्या.

यानंतर उर्वरित १० ओव्हरमध्ये 13व्या षटकात पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. मोहम्मद शमीने इफ्तिखार अहमदला बाद केले. इफ्तिखार 34 चेंडूत 51 धावा केल्या. १४व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने शादाब खानला कॅच आउट केले. कॅच सूर्यकुमार यादवने घेतला. 16व्या षटकात हार्दिक पांड्याने मोहम्मद नवाजला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडे झेलबाद केले. यानंतर अर्शदीप सिंगने १७व्या षटकात आपला तिसरी विकेट घेतली . तर भुवनेश्वरकुमारने शाहीन शाह आफ्रिदीच्या रूपाने पाकिस्तानला आठवा धक्का दिला.

यानंतर शेवटी पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या. पाकिस्तानकडून शान मसूदने 42 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी इफ्तिखार अहमदने 34 चेंडूत 51 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.