India vs Pakistan । रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, पाकिस्तान प्रथम फलंदाजी करणार
India vs Pakistan । नवी दिल्ली : रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आज T20 विश्वचषक सुपर 12 मधील ‘ब्लॉकबस्टर’ सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करत आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करेल.
भारतीय संघ व्यवस्थापनाने युझवेंद्र चहलपेक्षा रविचंद्रन अश्विन आणि ऋषभ पंतपेक्षा दिनेश कार्तिकला पसंती दिली आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या संघात अनुभवी फखर जमानच्या जागी शान मसूद खेळत आहे. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडले होते, ज्यामध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिलाच पराभव होता.
भारत संघ : रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी और अर्शदीप सिंह.
पाकिस्तान संघ : बाबर आजम ( कप्तान ), मोहम्मद रिजवान, शान मसूद, इफ्तिखार अहमद, हैदर अली, आसिफ अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, नसीम शाह, हारिस रऊफ और शाहीन शाह अफरीदी.
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | “… तर दिवाळीनंतर आम्ही रस्त्यावर उतरणार”, अंबादास दानवेंचा अब्दुल सत्तारांना जाहीर इशारा
- IND vs Pak | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचे रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मोठं वक्तव्य
- Abdul Sattar | मराठवाडा दौऱ्यावरून अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला, म्हणाले…
- Mohammed Shami : मोहम्मद शमी भारत-पाक सामन्यात गोलंदाजी करणार नाही; या माजी खेळाडूने सांगितले मोठे कारण
- Ajit Pawar | “…त्यापेक्षा त्यांनी सरळ रांगेत उभं राहावं”, अजित पवारांना ‘या’ आमदाराचा खोचक सल्ला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.