India vs South Africa : अखेर ऋषभला डच्चू!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 ऑक्टोबरला होत पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीनं या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये पंतला डच्चू देण्यात आला आहे, असे सांगितले. पंतच्या जागी या सामन्यात ऋध्दीमान साहाला संधी देण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात पंतला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळं त्याची संघातील जागा धोक्यात आली होती. अखेर आता विराट कोहलीनं फॉर्ममध्ये नसलेल्या पंतला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान तब्बल वर्षभराच्या काळानंतर ऋध्दीमान साहा संघात पुनरागमन करत आहे.

साहानं शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2018मधअये दक्षिण आफ्रिका विरोधातच खेळला होता. मात्र या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यामुळं साहाला संघाबाहेर बासावे लागले. त्यानंतर पंतला विकेचकीपर फलंदाज म्हणून संघात जागा मिळाली. मात्र पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचा फटका पंतला बसला आणि त्याला संघाबाहेर करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.