InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

एशियन गेम्स २०१८बद्दल कबड्डीपटू मोनू गोयतने व्यक्त केले रोखठोक मत

- Advertisement -

18 आॅगस्टपासून 18 व्या एशियन गेम्सला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत गतविजेता भारतीय संघ सुवर्णपदक कायम राखेल असा विश्वास भारताचा स्टार रेडर मोनू गोयतने व्यक्त केला आहे.

आत्तापर्यंत भारतीय पुरुष संघ एशियन गेम्समध्ये अपराजीत राहिला आहे. त्यांनी 1990 ते 2014 पर्यंत खेळलेल्या सातही एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यामुळे सलग 8 वे सुवर्णपदक जिंकण्यास भारतीय संघ उत्सुक आहे.

याबद्दल मोनू गोयत म्हणाला, ” आम्हाला आमची प्रथा कायम ठेवायची आहे. त्यामुळे आमचे ध्येय सुवर्णपदक मिळवणे हेच आहे. आम्ही याशिवाय दुसरा विचार करु शकत नाही.”

यावर्षीची एशियन गेम्स स्पर्धा इंडोनेशियामधील जकार्ता येथे 18 आॅगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. यात 19 आॅगस्ट ते 24 आॅगस्ट दरम्यान कबड्डीच्या स्पर्धा होतील.

त्याचबरोबर यावर्षी पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये 12 पुरुष संघ सहभागी होणार आहेत. यात भारत, इंडोनेशिया, इराण, इराक, जपान, कोरिया, मलेशिया, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, बांगलादेश यांचा समावेश आहे.

या संघांबद्दल मोनू गोयत म्हणाला, “सर्वच संघ चांगले आहेत आणि ते त्यांचे सर्वोत्तम देण्याचाच प्रयत्न करतील. पण कोरिया आणि इराण हे चांगले संघ आहेत. तसेच पाकिस्तान आणि बांगलादेश हे संघही उत्तम आहेत. हे 3-4 संघ लढत देऊ शकतात. ”

- Advertisement -

तसेच तो म्हणाला, “इराणचे खेळाडू भारतीय खेळाडूंबरोबर थांबून सराव करतात आणि त्यांची तयारी आपल्या खेळाडूंसारखीच असते त्यामुळे ते चांगली लढत देतात.”

मोनू गोयत हा यावर्षीचा प्रो-कबड्डीमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला हरियाणा स्टीलर्सने 1.51 कोटी रुपये देऊन संघात घेतले आहे.

मोनू गोयत बरोबरच याआधीच भारताचा कर्णधार अजय ठाकूरनेही भारत एशियन गेम्समध्ये सलग आठवे सुवर्णपदक मिळवेल हा विश्वास व्यक्त केला होता.

कबड्डीमधील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा कबड्डीसाठीचे देशातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १चे वेबपोर्टल महा स्पोर्ट्स. तसेच आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फाॅलो करायला विसरु नका.

महत्त्वाच्या बातम्या:

वाढदिवस विशेष-आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच जितेश शिरवाडकर यांची खास मुलाखत

मुंबई शहराचे कबड्डी पंच शिबीर यशस्वी

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.