InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘प्रियांका गांधी चोराच्या पत्नी आहेत’, भाजप नेत्या उमा भारतींचे वादग्रस्त विधान

- Advertisement -

“प्रियांका गांधी चोराच्या पत्नी आहेत. संपूर्ण हिंदुस्तान त्यांना याच नजरेने पाहणार.”, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी केले आहे. छत्तीसगडमधील दुर्ग लोकसभा मतदार संघात गेल्या होत्या. यावेळी त्या माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

प्रियांका गांधी वाराणासी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, त्यावर उमा भारती म्हणाल्या की, त्यांच्या पतीवर चोरीचा आरोप आहे, त्यामुळे चोराच्या पत्नीकडे ज्या नजरेने पाहिले जाते. त्याचप्रकारे हिंदुस्तान प्रियांका गांधीकडे पाहणार आहे. भारतात लोकशाही आहे. त्यामुळे कोणताही इच्छूक उमेदवार कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढू शकतो.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.