InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

….तर ‘या’ टीम विरोधात होणार भारताची सेमीफायनल

न्यूझीलंड संघाचा पराभव करत यजमान इंग्लंडने उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतील चार संघाची नावे जवळजवळ ठरली आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे उपांत्य फेरीतील चार संघ जवळजवळ निश्चित झाले आहेत. भारतीय चाहत्यांपुढे प्रश्न आहे की विराट अॅण्ड कंपनीला उपांत्य फेरीत कोणाशी दोन हात करावे लागणार आहेत. जाणून घेऊयात भारतीय संघासोबत उपांत्य फेरीत कोणता संघ आपले आव्हान ठेवतो…

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील साखळी सामन्यानंतर भारताचा उपांत्य फेरीतील सामना कोणाशी होणार हे ठरेल. जर अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला तर भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना करावा लागणार आहे. हा सामना ११ जूलै रोजी होणार आहे. जर आपल्या अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि भारताने श्रीलंकेला धूळ चारली. तर उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply