कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत सर्व जागतिक स्पर्धा जिंकेल !

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ‘आयसीसी’च्या सर्व स्पर्धा जिंकू शकतो, असा विश्वास वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराने व्यक्त केला आहे. ३१ वर्षीय कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला अद्याप एकही ‘आयसीसी’ स्पर्धा जिंकता आलेली नसली तरी २०१७च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत आणि २०१९च्या विश्वचषकात भारताने अनुक्रमे अंतिम आणि उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक

त्यामुळेच काही आठवडय़ांपूर्वी फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोशी कोहलीची तुलना करणाऱ्या लाराने पुन्हा एकदा त्याचे कौतुक केले आहे. ‘‘कोहलीकडे अफाट कौशल्य असून त्याच्या कर्णधारपदात भारत नक्कीच ‘आयसीसी’ स्पर्धावर वर्चस्व मिळवू शकतो.

‘मलायकाशी लग्न केलं तर…’अर्जुन कपूरचा नवा खुलासा !

विशेषत: सध्याच्या भारतीय संघाला कोणत्याही खेळपट्टीवर कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी विजय कसा मिळवायचा हे अवगत असल्याने आगामी ‘आयसीसी’ स्पर्धामध्ये त्यांना रोखणे कठीण असेल,’’ असे ५० वर्षीय लारा म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.