InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

India

अरुणाचल प्रदेशमधील तीन आमदारांना मंत्रिपद देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

अरुणाचल प्रदेशमधील तीन आमदारांना एका व्यक्तीने कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून संजय तिवारी असे त्याचे नाव आहे.तिवारी याने स्वतः खासदार असल्याचे सांगून आमदारांकडून पैसे घेतले होते. आरोपी संजय तिवारीशी त्यांची ओळख गेल्या वर्षी दिल्लीतील एका कार्यक्रमात झाली होती. अरुणाचल प्रदेशला परतल्यानंतर आमदारांनी मंत्रिपदासाठी त्याला फोन केला. त्यावेळी फोनवर आरोपीने वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगत पैशांची मागणी…
Read More...

कर्नाटक काँग्रेसचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील अचानक गायब

कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारला आज, गुरुवारी (ता.१८) विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस-निजद आघाडी सरकार संकटात असतानाच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कर्नाटक काँग्रेसचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील अचानक गायब झाले आहेत.पाटील यांना रात्री ८ वाजता अखेरचे रिसॉर्टमध्ये पाहिले होते. त्यानंतर ते गायब झाले. अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही. काँग्रेसची १० पथके त्यांचा शोधाशोध घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. काँग्रेसचे आमदार पाटील यांचा…
Read More...

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आयसीजेची स्थगिती

अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या कुलभूषण जाधव खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा मोठा विजय झाला आहे. पाकच्या कारागृहात बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आयसीजेने स्थगिती कायम ठेवली आहे. याशिवाय पाकने शिक्षेवर फेरविचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत नाकारली जाऊ शकत नाही, असेही स्पष्ट केले आहे. या निकालामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मोठा विजय झाला आहे. या निकालामुळे कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत मिळण्याचा मार्ग…
Read More...

अंत्योदय रेल्वे रुळावरुन घसरली; कोणतीही जीवितहानी नाही

मध्य रेल्वेची कसाऱ्याच्या पुढील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-इगतपूरी दरम्यान अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंत्योदय एक्स्प्रेस ही गाडी घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. स्टेशन काही मिनिटे दूर असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही.जर मोठा अपघात झाला असता तर जवळपास 100 ते 150 फूट खोल दरीत हे डबे खाली पडले असते. या बाबत रेल्वे प्रशासनाला या अपघाताबाबत माहिती…
Read More...

शहीद जवानांच्या आर्थिक मदतीत वाढ; मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार

देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैन्यातील जवान आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ केली आहे. यानुसार शहीद जवानाच्या नातेवाईकांना 25 लाखांऐवजी एक कोटींची मदत देण्यात येणार आहे. तर जखमी जवानांना 20 ते 60 लाखांपर्यंत मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली कॅबिनेट बैठकीत काल (16 जुलै) हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे आम आदमी पक्षाने (आप)  कौतुक केले आहे.“राजकीय सीमा बाजूला ठेवून महाराष्ट्रातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल…
Read More...

देशातील घुसखोरांना हद्दपार करू – केंद्रीय गृह मंत्री अमित शहा

देशातील इंच-इंच जमिनीवरून घुसखोर आणि अवैध प्रवाशांची ओळख पटवून त्‍यांना आंतरराष्‍ट्रीय कायद्‍याच्या आधारे बाहेर पाठविण्यात येईल, असा इशारा राज्‍यसभेत प्रश्नोत्‍तर तासा दरम्‍यान केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिला. आसाममधील राष्‍ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (NRC) आसाम कराराचा भाग असल्याचे शहा म्हणाले.केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी यावेळी बोलताना म्हणाले, की सर्वांनी सदनमध्ये राष्‍ट्रपतींचे भाषण ऐकले असेल, ज्‍या निवडणूक जाहीरनाम्‍याच्या आधारावर आम्‍ही निवडून आलो आहोत, त्‍यामध्ये देखील…
Read More...

हाफिज सईदला केलेली अटक पाकिस्तानचे ढोंग – उज्वल निकम

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. हाफिज सईदच्या अटकेवरुन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी हाफिज सईदला करण्यात आलेली अटक म्हणजे पाकिस्तानचे ढोंग आहे. त्यामुळे भारताने सावध राहिले पाहिजे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.उज्ज्वल निकम म्हणाले, "हे भारताच्या कुटनीतीचे यशस्वी पाऊल आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील जे पुरावे सादर…
Read More...

आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास ग्राहकाला दहा हजारांचा

सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना चूक झाल्यास दहा हजारांचा दंड बसणार आहे. सरकार लवकरच ’इन्कम टॅक्स ऍक्ट’शी संबंधित नियमावलीत बदल करणार आहे. त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्याकडून दहा हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार नंबर चालू शकणार आहे, ही महत्त्वाची घोषणा दुसऱ्या टर्मचा पहिल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली होती.बँकेच्या कुठल्याही आर्थिक व्यवहारात आधार…
Read More...

बिहारमध्ये पावसाचे थैमान ; जीव वाचवण्यासाठी लोक खात आहे उंदीर

महानंदा नदीच्या पुरामुळं बिहारमधील कटिहार जिल्ह्यात दाणादाण उडाली असून सरकारी मदत पोहोचत नसल्यानं लोकांचे खायचेही वांधे झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी उंदीर खाऊन पोट भरण्याची वेळ पूरग्रस्तांवर आली आहे.कटिहार शहरापासून ३५ किलोमीटरवर असलेल्या कडवा भागातील १२ गावे महानंदा नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. तब्बल ३०० कुटुंबांना रस्त्याच्या कडेला निवारा केंद्रात आश्रय घ्यावा लागला आहे. यातील बहुतांश कुटुंब महादलित व अनुसूचित जमातीतील आहेत. पुरानं संसार उद्ध्वस्त केल्यापासून या कुटुंबाचे भयंकर…
Read More...