InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भारतीय सैन्यदलाची कारवाई होऊनही पाकिस्तानचा भलताच कांगावा

- Advertisement -

भारतीय सैन्यदलाकडून पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे.  या कारवाईमध्ये भारतीय सैन्यदलाकडून अनेक दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. मुख्य म्हणजे पाकिस्तानकडूनही या हल्ल्याची कबुली देण्यात आली आहे. पण, त्यातही त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती मात्र अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.

‘भारताकडून जुरा, शाकोट आणि नौशेरा सेक्टरमध्ये स्थानिकांवर निशाणा साधत बेछूट गोळीबार करण्यात आला. ज्याचं पाकिस्तानकडून अतिशय प्रभावी उत्तर देण्यात आलं. यामध्ये ९ भारतीय जवान मारले गेले तर, काही जखमी झाले. भारतीय सैन्याचे दोन बंकर उध्वस्त करण्यात आले. दोन्ही देशांकडून झालेल्या या गोळीबारात पाकिस्तानचा एक जवान आणि तीन नागरिकांना मरण आलं. तर, दोन जवान आणि पाच नागरिक या घटनेत जखमी झाले’, अशी माहिती पाकिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आली.

Loading...

- Advertisement -

Loading...

दरम्यान, भारतीय सैन्यदलाने पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱे दहशतवादी तळ उध्वस्त करत शेजारी राष्ट्राकडून सतत होणारे घुसखोरीचे प्रयत्न आणि दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर दिलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.