InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भारतीय लष्कराचा गणवेश बदलणार; मागवल्या सूचना!

- Advertisement -

भारतीय सैन्यदलातील अधिकारी व जवानांच्या गणवेशात लवकरच काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. यासंदर्भात भारतीय लष्कराच्या मुख्यालयातून सर्व जवानांना आणि अधिकाऱ्यांना  सूचना देण्यास सांगितले आहे.

भारतीय लष्कराच्या जवानांचा पोशाष अधिक स्मार्ट आणि आरामदायी करण्यात येणार आहे.सीमेवर संरक्षण करत असताना अनेकदा हवामानात बदल होतात. यामुळे जवानांना युद्धावेळी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे बदलत्या हवामानाला अनुसरुन सैन्याचा गणवेश तयार करण्यात यावा, असे प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -

भारतीय सैन्यातील जवानाकडे चार प्रकारचे गणवेश असतात. युद्धभूमीवरील गणवेश(कॉम्बॅट), शांततेच्या काळातील गणवेश(पीस टाइम), जेवतानाचा युनिफॉर्म (मेस) आणि विशेष कार्यक्रमांचा गणवेश (सेरिमोनियल) असे हे चार प्रकार आहेत. हे चारही प्रकारचे गणवेश बदलले जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.